मॉस्कोहून गोव्याकडे येणाऱ्या प्रवासी विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी!

मॉस्कोहून गोव्याकडे येणाऱ्या प्रवासी

विमानाला बॉम्बने उडवण्याची

धमकी!

 

पणजी : रशियातील मॉस्कोहून गोव्याच्या दिशेने येणारं

विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा

धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धमकीचा इ-मेल

गोल्यातील डाबोलिम विमानतळ प्रशासनाला

मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलंत हे प्रवासी

विमान उझबेकिस्तानच्या दिशेने वळवलं आहे. या

विमानावर तब्बल 240 प्रवासी होते, अशी माहिती

पोलिसांकडून देण्यात आली आहे.

यासंदर्भात सविस्तर तपास लागलीच सुरू करण्यात आला

आहे. याआधीही 10 जानेवारी रोजी अशाच प्रकारची

धमकी मॉस्को-गोवा विमानासंदर्भात देण्यात आली होती.

नेमकं काय घडलं?

Moscow-Goa AZV2463 हे प्रवासी विमान आज

पहाटे 4 वाजून 15 मिनिटांनी दक्षिण गोव्यातील डाबोलिम

विमानतळावर उतरणार होतं. मात्र, रात्री साडेबाराच्या

सुमारास डाबोलिम विमानतळाच्या संचालकांना त्यांच्या ई-

मेल आयडीवर विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी

देणारा मेल आला. त्यामुळे विमान भारतीय हवाई हद्दीत

शिरण्याआधीच हे उझबेकिस्तानकडे वळवण्याचा निर्णय

घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली

आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post पोलिस आयुक्त कार्यालय नव्या जागेत…
Next post आ. अभय पाटील आयोजित अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवचा शुभारंभ.