शिवचरित्र प्रकल्पाचे लोकार्पण दि. 15 फेब्रुवारीपूर्वी ….
बेळगाव :
येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवचरित्र प्रकल्पाचे लोकार्पण येत्या दि. 15 फेब्रुवारीपूर्वी करण्यात येणार आहे. या दृष्टीने सर्व तयारी करण्यास प्रारंभी झाला आहे, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवरायांचा इतिहास सर्व नागरिकांना समजावा यासाठी मराठी आणि कन्नड अशा दोन भाषांमध्ये येथील लाईट ॲड. साउंड शो तयार करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
याच्या उद्घाटनासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडून तारीख मिळाल्यानंतर उद्घाटन करण्याचे निश्चित झाले आहे.
त्यांच्याकडून योग्य वेळ मिळाली नाही तर येत्या दि. 15 फेब्रुवारी हे उद्घाटन निश्चित करून प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.