मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, नऊ प्रवाशांचा मृत्यू महाराष्ट्र

मुंबई-गोवा हायवेवर भीषण

अपघात, नऊ प्रवाशांचा मृत्यू

महाराष्ट्र

 

रायगड :

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला

असून अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड

जवळील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण

अपघात झाला. दरम्यान, अपघाताचं कारण मात्र अद्याप

अस्पष्टच आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी

घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. तसेच,

अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली

होती. पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहानं बाजूला

करुन वाहतूक पूर्ववत केली आहे.

रायगडजवळील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकची

समोरासमोर धडक झाली आणि भीषण अपघात झाला. या

अपघातात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, इको कार आणि

ट्रकची समोरासमोर धडक झाली. गोरेगाव हद्दीतील

रेपोलीनजीक पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. तर गाडीतून

प्रवास करणाऱ्या नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना आज (गुरुवारी)

पहाटेच्या वेळी मुंबई-गोवा महामार्गावर घडली. मुंबई-गोवा

महामार्गावरील गोरेगाव हद्दीतील रेपोलीजवळ आज

पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघात

झाला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, कार आणि

ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि अपघात

झाला. या अपघातात कारमधील सर्वच्या सर्व 9 प्रवाशांचा

मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच, या

अपघातात 5 महिन्यांचं बाळ बचावल्याची माहिती मिळत

आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post आ. अभय पाटील यांच्या ड्रीम प्रॉजेक्ट असलेले शिवसृष्टी लवकरच खुली होणार
Next post बेळगावात आमदार अभय पाटील आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 21 ते 24 जानेवारीदरम्यान.