आ. अभय पाटील यांच्या ड्रीम प्रॉजेक्ट असलेले शिवसृष्टी लवकरच खुली होणार
बेळगाव : प्रतिनिधी
शिवभक्तांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार असून शिवजयंतीपूर्वी शिवसृष्टीचे लोकार्पण केले जाणार आहे. यासाठी आ. अभय पाटील यांनी सोमवारी शिवाजी उद्यानाला भेट देऊन शिवसृष्टीच्या
कामाचा आढावा घेतला. शिवसृष्टीच्या कामाला 2012 मध्ये सुरवात करण्यात आली. त्यानंतर 2013 आणि 2017 मध्ये दोनवेळा शिवसृष्टीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतरही काही उर्वरित कामे करण्यात आली.
मध्यंतरी आ. अभय पाटील यांनी शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण दिले होते. मात्र, ते येऊ न शकल्याने उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडले.
आता शिवजयंतीपूर्वी शिवसृष्टीचे लोकार्पण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वर्षापासून रखडलेल्या शिवसृष्टीचे लोकार्पण करण्यासाठी आ. अभय पाटील यांनी शिवसृष्टीची पाहणी केली आहे.