महापौर निवडणुकीसाठी मनपाच्या हालचाली सुरू
बेळगाव : प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तब्बल दीड वर्षानंतर महापौर निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी आता वेळापत्रक निश्चित झाल्यामुळे मनपा वर्तुळातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. मनपा यंत्रणेला लोकनियुक्त सभागृह मिळण्याची वेळ आली असल्यामुळे नगरसेवकांमध्ये उत्साह संचारला आहे.
त्रिभाषा धोरण स्वीकारलेल्या महापौर, उपमहापौर महापालिकेने निवडणूक नोटीस नगरसेवकांना कन्नडमध्ये पाठवली आहे. मराठी भाषेवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवकांत संताप व्यक्त करण्यात येत असून प्रादेशिक आयुक्तांकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.
6 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवडणूक होणार आहे. प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ निवडणूक अधिकारी आहेत. 9 जानेवारी रोजी नगरप्रशासन खात्याकडून आदेश आल्यानंतर प्रादेशिक आयुक्तांनी महापौर, उपमहापौर निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे.