आ. सतीश जारकीहोळी यांची भाजपवर टीका
बेळगाव : प्रतिनिधी
राज्यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजप पक्षाची हवा गायब झाली आहे. भाजप नेत्यांकडून कोमेजणाऱ्या कमळावर पाणी शिंपडण्याचे काम सुरु आहे, अशी टीका केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी केली.
येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणूक दृष्टीक्षेपात ठेवून भाजपकडून विविध उपक्रम राबवून जनतेला खोटी आश्वासने दिली जात आहेत.
2023 च्या निवडणुकीत सर्व मतदार हाताला साथ देणार असल्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी केपीसीसी सचिव सुनील हणमण्णवर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते.