अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्याच्या चार भागात
रथयात्रा काढण्यात येणार : मुख्यमंत्री बसवराज
बोम्मई
बेंगळूर:
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्याच्या चार भागात
रथयात्रा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज
बोम्मई यांनी सांगितले.
दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी होत
असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले
की, कार्यकारिणीत अनेक राजकीय निर्णय घेण्यात आले.
ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्याबाबतचा
अहवाल सादर करण्यात आला. बूथ स्तरावरील कार्यक्रमातून
संघटनेची माहिती देण्यात आली आहे.
राज्यात सत्ताविरोधी लाटेशिवाय मी निवडणुकीला सामोरे
जात आहे. नकारात्मक प्रसिद्धीचे प्रयत्न करूनही काही
उपयोग झाला नाही. राज्यात भाजपने काढलेल्या संकल्प
यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अर्थसंकल्पीय
अधिवेशनानंतर चारही बाजूंनी रथयात्रा काढण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे. ते कसे करायचे हे ठरलेले नाही. मात्र
रथयात्रा चारही दिशांनी करायची, असे ठरल्याचे त्यांनी
सांगितले.