सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर येथे एल.के.जी.आणि यु.के.जी. वर्गाचे शानदार उद्घाटन
बेळगाव
आज बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी जयंतीच्या शुभमुहूर्तावर सरकारी मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथे शासनाच्या आदेशानुसार एल.के.जी .आणि यु.के.जी. वर्गाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गांधीजींच्या आणि लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेचे पूजन करून आणि गांधीजींचे भजन गाऊन करण्यात आली. त्यानंतर एल.के.जी. वर्ग खोलीचे एस.डी.एम.सी. अध्यक्षा सौ. रूपा धामणेकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर एल.के जी मध्ये दाखल झालेल्या सर्व मुलांना फुगे देऊन त्यांना वर्गात दाखल करून घेतले.उपाध्यक्ष श्री जोतिबा उडकेकर यांनी उपस्थित पालकांचे स्वागत केले. मुख्याध्यापक श्री आर.एम. चलवादी आणि माजी प्रभारी मुख्याध्यापिका शोभा निलजकर यांनी पालकांना वर्ग चालू करण्यासंदर्भात माहिती दिली.हा वर्ग चालू करण्यासाठी शाळेच्या एस.डी.एम.सी समितीने व शिक्षक वर्गाने जय्यत तयारी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस.बाळेकुंद्री यांनी केले तर श्री एस.बी.पाखरे यांनी आभार मानले. उपस्थित सर्व मुलांना अल्पोपहार व चॉकलेट देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.