वार्ड नं.15 मध्ये डेंगू प्रतिबंधक लसीकरण मोहिम.
बेळगाव :
पावसाळ्यात डासांची झपाट्याने वाढ होत असल्याने सगळीकडे डेंग्यु आणि चिकणगुणिया झालेले अनेक रुग्ण पहावयास मिळत आहेत त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आ .अभय पाटील यांच्या विशेष पुढाकाराने आणि मार्गर्शनाखाली,वार्ड नं.15 च्या नगरसेविका सौ.नेत्रावती विनोद भागवत यांनी आपल्या वार्डामध्ये गेल्या काही दिवसांपासू डेंगू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवित आहेत.
त्या स्वता आपल्या कार्यकर्त्यांसह घरोघरी जावून आणि सार्वजनिक ठिकाणाहून हे कर्तव्य पार पाडत आहेत. ह्या कार्याबद्दल स्थानिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.