सांबरा विमानतळावर 1.50 लाखांची रोकड जप्त
सांबरा विमानतळावर 1.50 लाखांची रोकड जप्त
बेळगाव-22:
कुंदनगरी बेळगाव सांबरा विमानतळावर जसवीर सिंग नावाच्या व्यक्तीकडून निवडणूक अधिकाऱ्यांनी 1.50 लाखांची रक्कम जप्त केली.
तहसीलदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मारिहा येथील एफएसटी टीम बी चे शशिकांत कुळेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन व्यक्तीकडून बॅगेतील रोकड जप्त केली.अधिकाऱ्याने व्हिडिओ रेकॉर्ड करून ही रक्कम जप्त केल्याची माहिती दिली आहे.