स्मार्ट सिटी कामांच्या विरोधात मोर्चा ?
बेळगाव:
बेळगाव नागरिक रक्षण समितीतर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या अनुचित कामांच्या विरोधात आज छ.शिवाजी उद्यान येथील जंक्शनवर रास्ता रोको करून आ.अभय पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हा विरोध स्मार्ट सिटीच्या कामापेक्षा आ. अभय पाटील यांच्या विरोधात जास्त होताना दिसत होता. हा मोर्चा सर्वपक्षीय असणार असल्याचे बोलला जात असला तरी त्यात काँग्रेसचा मोठा भाग होता आणि हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कमी बाकी पक्षांचा होता.
या मोर्चा मध्ये राष्ट्रपतींना आव्हान देणारे काही नेते होते .या नेत्यांनी समजून घेतले पाहिजे की राष्ट्रपती फक्त पुरस्कार देतात ते सर्वोत्तम उमेदवार निवडत नाहीत. त्यामुळे कोणतेही शहर पुरस्कारासाठी निवडण्याची प्रक्रिय आहे.
स्मार्ट सिटीच्या कामात गैरप्रकार होत असतील तर केवळ विरोध करून काहीही होणार नाही, किंबहुना ते अभय पाटील यांचे नाव चर्चेत ठेवून त्यांना प्रसिद्धी मिळवून देण्यात अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत.
आजपर्यंत छ.शिवाजी उद्यान येथून निघालेल्या कोणत्याही मोर्चा सुरु होण्या आधी छ.शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्या नंतर मोर्चा सुरु करण्याची परंपरा होती ,पण आज सर्वजण आ.अभय पाटील यांना टार्गेट करण्यात इतके मग्न झाले होते की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची परंपराच विसरले.