*वार्ड क्रमांक 15 मधील रस्त्यांची गणेश उत्सवानिमित्त डागडुजी*
बेळगाव:
काहीच दिवसावर येऊन ठेपलेल्या श्री गणेश उत्सवासाठी वार्ड क्रमांक 15 मधील ज्या रस्त्यावरून गणपती मुर्तींचे आगमन व विसर्जनासाठी ज्या मार्गाचा वापर केला जातो अशा खराब झालेल्या रस्त्यांचे डागडूजीकरण नुकतेच करण्यात आले.
बेळगाव दक्षिणचे आमदार श्री अभय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक 15 च्या नगरसेविका
सौ. नेत्रावती विनोद भागवत यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या वतीने ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडून जे अडथळे निर्माण झाले होते अशा ठिकाणी म्हणजेच तानाजी गल्ली जवळील रेणुका मंदिर पाशी, समर्थ नगर माणिकबाग येथील जुना पीबी रस्ता आणि इतर ठिकाणी नगरसेविकेने गणेशोत्सवा काळात आगमन असो वा विसर्जन असो कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी या रस्त्याची डागडुजी नुकतीच करवून घेतली.
काही गणेश मंडळाने देखील ह्यासाठी मागणी नगरसेविकेकडे केली होती त्याप्रमाणे येथील नगरसेविका सौ नेत्रावती विनोद भागवत यांनी आमदार अभय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार हे काम पूर्णत्वास नेले यावेळी महानगरपालिकेचे निरीक्षक बसवनगौडा पाटील रोहित आणि इतर कर्मचारी उपस्थित होते .
या कामाबद्दल तेथील स्थानिकांकडून आणि गणपती मंडळाकडून नगरसेविकेचे आणि आमदार अभय पाटील साहेबांचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले.