सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिलाच भारतीय खेळाडू
बेळगाव:
सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिलाच भारतीय खेळाडू वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत रविवारी रात्री पुरुषांची भालाफेकीची अंतिम फेरी पार पडली. या अंतिम फेरीत भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने ८८.१७ मीटर भाला फेकीसह सुवर्णपदकाला गवसणी घातली.
वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
रविवारी अंतिम फेरीत नीरजपाठोपाठ पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८७.८२ मीटर भाला फेकीसह रौप्य पदक जिंकले, तर चेक गणराज्यचा जाकुब वडलेजचने ८६.६७ मीटर भाला फेक करत कांस्य पदक जिंकले.