नितीन जाधव यांच्या पुढाकाराने हिंदवाडी येथील उद्यान मधील अंधार दूर
बेळगाव:
वार्ड क्र.29 मधील ,हिंदवाडी येथील सुभाष गार्डन , गणेश गार्डन, भगतसिंह गार्डन मधील लाईट खूप दिवसांपासून बंद होते.नागरिकांना एक विरंगुळ्याचा क्षण मिळावा यादृष्टीने उद्यानाची निर्मिती करण्यात येतात.अंधाराचा फायदा घेत तळीरामांचा अड्डासह अनेक अवैध प्रकार रात्री घडू शकतात.
वॉर्ड क्र.29 रहिवासीने जेव्वा नगरसेवक नितीन जाधव यांना सांगितले .ते त्वरीत आ.अभय पाटील यांना भेटून त्यांच्या मार्गर्शनाखाली संबंधीत अधिकरिंशी चर्चा करून मंगळवारी दि. 8 ऑगस्ट ला लाईट बसवण्यात आले.
आ अभय पाटील आणि नगरसेवक नितिन जाधव यांचा या कामा बद्दल वॉर्ड क्र.29 नागरीक समाधानी आहेत आणि आभार ही मानले.या उपक्रमाचा वेळी राजन निखार्गे, उदय पाटील, अजित पाटील, केवल दळवी, मनोज केरवाडकर उपस्थित होते