सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
मुंबई :
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.
नितिन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते. 1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.
नितिन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. आता त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करत आहेत. नितिन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितिन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितिन देसाई हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. 80 च्या दशकात नितिश देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमाने नितिन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं.