नितीन जाधव यांच्या संपर्क कर्यालया मध्ये आधार कार्ड वरती मोबाईल नंबर अपडेट कॅम्प संपन्न.
बेळगाव:
वॉर्ड क्र.29 चे नगरसेवक नितीन जाधव यांच्या संपर्क कर्यालया मध्ये , आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आधार कार्ड वरती मोबाईल नंबर अपडेट करायचे कॅम्प संपन. ह्या कामा बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले . एकूण 100 हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतले .
लोकांना बेळगाव वन मध्ये 3 ,4 तास थांबून हे काम करून घ्यावे लागत होते आणि आता तर गृहलक्ष्मी योजना साठी तिथे जाणं कठीण झालेलं आहे.याचा विचार करून नगर सेवक नितिन जाधव यांनी आपल्या वॉर्ड नंबर 29 मधील नागरिकांसाठी हे कॅम्प भरविले .
या वेळी समीर खान, अमित सुभेदार, राजू सूनगर, प्रज्वल शेटप्पणावर, आशिष जमखंडी, मनोज केरवाडकर, मंजू हिरेमठ, गजानन नकाडी यानी परिश्रम घेतले
वयोवृध्द नागरीकांच्या त्यांच्या घरी जाऊन हि सेवा देण्यात आली.वॉर्ड क्र.29 रहिवाशी नगरसेवक नितीन जाधव यांच्या या उपक्रमाचा कौतुक केले आणि त्यांचा आभार मानले.