उच्च न्यायालया कडून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना नोटीस
बंगळुरू:
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांच्या आमदारकी रद्द करण्याच्या याचिकेच्या संदर्भात उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
के.एम.शंकर यांनी मतदारांना आमिष दाखवून सीएम सिद्धरामय्या यांची आमदारकीसाठी केलेली निवडणूक अवैध ठरवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाने सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या स्वाक्षरीने हमी योजनेचे कार्ड वाटून मतदारांना आमिष दाखवले. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२३(१) नुसार, मतदारांना आमिष दाखविण्याची परवानगी नाही. त्यामुळे सिद्धरामय्या यांची आमदारकीची निवडणूक अवैध ठरवण्यासाठी के.एम. शंकर यांनी अर्ज केला होता. आता हायकोर्टाने या अर्जावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना नोटीस बजावली आहे.