जी जी चिटणीस स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी क्रीडा मैदानाचे उद्घाटन
बेळगांव ः ,
अनुदानाशिवाय संस्था चालविणे अत्यंत कठीण आहे अशा परिस्थितीत जी जी चिटणीस शाळेने अत्यंत अत्याधुनिक क्रीडा संकुलाची उभारणी केली याचा मला अभिमान वाटतो असे पालक मंत्री सतीश जारकीहोळी जी जी चिटणीस हायस्कूलच्या नूतन सुवर्ण महोत्सवी क्रीडा मैदान उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रहास अणवेकर हे होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी नाडगीत तर इषा वेर्णेकर हिने स्वागत गीत सादर केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्या नवीना शेट्टीगार यांनी करुन दिला.
प्रारंभी सतीश जारकीहोळी यांनी फीत कापून सुवर्ण महोत्सवी क्रीडा मैदानाचे उद्घाटन केले. यावेळी उपाध्यक्ष व्ही एन जोशी, ट्रस्टी एस एन देसाई, प्राचार्या नवीना शेट्टीगार, आम. आसिफ उर्फ राजू सेठ, आम. बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आॅलिंपिक हाॅकीपटू मेजर ध्यानचंद, बंडू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.
ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्टची माहिती अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रहास अणवेकर यांनी दिली. तसेच नूतन अद्यावत गोल्डन ज्युबिली क्रीडा मैदान सुमारे 1.5 लाख खर्च करुन उभारणी करण्यात आली असल्याचे सांगितले. सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी क्रीडा मैदानाच्या उभारणीसाठी खास प्रयत्न केल्याबद्दल इंद्रनील अणवेकर,10 वी च्या गुणी विद्यार्थ्यांचा तसेच राष्ट्रीय जलतरण पटूंचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेस्सी थाॅमस यांनी तर आभार प्रदर्शन झेबाखानुम मुल्ला यांनी केले.
यावेळी हाॅकी बेळगांवचे सुधाकर चाळके, प्रकाश कालकुंद्रीकर, संजय शिंदे, मनोहर पाटील, विकास कलघटगी, मनोहर कालकुंद्रीकर, उदय शेट्टी, संताजी संभाजी, इंद्रनील अणवेकर, अरुण पाटील, सुरेश कळ्ळेकर, अॕड. एस बी बुदीहाळ, अॕड मंजुनाथ गोलीहळ्ळी आदी उपस्थित होते.