खासगी बस पलटी, चालकाचा जागीच मृत्यू
खासगी बस पलटी, चालकाचा जागीच मृत्यू
यल्लापूर :
उत्तरा कन्नड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 63 वर भीषण अपघात झाला. खासगी बस पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला.
बेंगळुरूहून गोव्याकडे जाणाऱ्या एका खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.