17 वर्षीय युवती बेपत्ता
बेळगाव :
संत रोहिदासनगर, उद्यमबाग येथील 17 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार युवतीच्या वडिलांनी उद्यमबाग पोलीस ठाण्यात दिली आहे.
आकृती सतीश सुरूतेकर असे तिचे नाव असून गेल्या मंगळवारी दिनांक 11 जुलै रोजी रात्री 12:30 ते 1:30 या दरम्यान घरात कुणालाही न सांगता ती घराबाहेर पडून बेपत्ता झाली आहे. घराबाहेर पडताना या युवतीने अंगावर गुलाबी स्वेटर व निळी जीन पॅन्ट परिधान केली आहे. तिला मराठी आणि इंग्रजी भाषा येते. ळ, असे वडिलांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
तिची उंची 4 फूट 9 इंच असून ती अंगाने सडपातळ आहे. सावळा वर्ण, उभट चेहरा, जाड नाक असे तिचे वर्णन असून सदर युवती कोणाला आढळल्यास अथवा तिच्याबद्दल माहिती असल्यास संबंधितांनी उद्यमबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.