हिंदवाडी येथे मुलीचा अपहरणाचा प्रयत्न.
बेळगाव :
बेळगाव येथे बालकांना पळवून नेणारी टोळी सक्रीय असून त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील हिंदवाडी पोस्ट ऑफिसजवळ मंगळवारी सायंकाळी नऊ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्याने शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीला चॉकलेट देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला.
तिने अपहरणकर्त्याला एक-दोन वेळा चपाठ मारली आणि आरडाओरडा केला. मात्र, जेव्हा तो तिला उचलण्याचा प्रयत्न करणार तेव्हढ्यात तिथे लोकांची गर्दी झाली. शेवटी तो तिला सोडून पळून गेल्याची माहिती आहे.
नगरसेवक नितीन जाधव यांना ही बाब कळताच ते तिथं पोहचले आणि पुढाकार घेवून काही प्रतिष्ठीत नागरिकांसोबत , टीलकवाडी पोलीस स्टेशन मध्ये त्या मुलीच्या आईला घेवून पोहचले.
याबाबत मुलीच्या आईने टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता अपहरणकर्त्या मुलीला उचलून पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज आढळून आले.
नगरसेवक नितीन जाधव यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की ह्याचा छडा लवकरात लवकर लावावेत.