स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध.
बेळगांव:
शुक्रवारी सकाळी बेळगाव मनपात महापालिका स्थायी समिती अध्यक्ष निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. सदर प्रक्रिये अंती अर्थ स्थायी समिती अध्यक्षपदी विणा विजापुरे, आरोग्य स्थायी समिती अध्यक्षपदी रवी धोत्रे, बांधकाम स्थायी समिती अध्यक्षपदी विणा जोशी तर लेखा स्थायी समिती अध्यक्षपदी सविता पाटील यांची निवड झाली आहे.
महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या अध्यक्षपद निवडीनंतर आ. अभय पाटील तसेच माजी आ. अनिल बेनके यांनी या नूतन अध्यक्षांचे अभिनंदन केले. यावेळी मनपा आयुक्त दुडगुंटी हे देखील उपस्थित होते.