वीज बिल वाढीविरोधात अखिल भारतीय महिला हक्क संघटने कडून निषेध.
बेळगाव : वीज बिल वाढीविरोधात अखिल भारतीय महिला हक्क संघटनेने सोमवारी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
काँग्रेसच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी राज्यात सरकार आल्यावर वीजबिल माफ करणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले होते.मात्र आता वीज बिल दुप्पट येत आहे.
सरकार एका डोळ्यात लोणी आणि दुसऱ्या डोळ्यात चुना घालत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली.प्रत्येक घराला 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
मात्र गेल्या पंधरवड्यापासून प्रत्येक युनिटचे बिल दुप्पट येत आहे.हे सरकारचे दुटप्पी धोरण आहे.या महिन्यापासून आम्ही वीज बिल भरणार नाही, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला.
निवडणुकीपूर्वी आमचे बिल स्वाभाविकपणे येणार होते.मात्र निवडणुकीनंतर अचानक बिल वाढत आहे.घरखर्च, खर्च, मुलांच्या शाळेचा खर्च पुरेसा होईना.
दरम्यान, हेस्कॉमकडून तीन महिन्यांचे बिल आले आहे.जून महिन्याचे वीज बिल आम्ही कोणत्याही कारणास्तव भरणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.
राम बनवानी, दीपा लेंगडे, सुवर्णा कदम, मालन गोदाई, रेणुका उदया, रेखा पाटील, प्रभावती चव्हाण, सावित्री मोळवे आदी उपस्थित होते.