काँग्रेसनी विनाशर्त गॅरंटी आता सशर्त गॅरंटी केलेल्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन
बेळगाव :
राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर प्रथमच भाजप काँग्रेस सरकारविरोधात पहिली लढाई लढत आहे.आज आणि उद्या भाजपने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.वीज दरवाढ, गोहत्या बंदी रद्द, दूध प्रोत्साहन कपात याविरोधात भाजप आंदोलन करणार आहे.
सर्व जिल्हा केंद्रांवर आज आणि उद्या राज्यभरात निदर्शने करण्यात येणार आहेत.आंदोलनात आमदार, माजी मंत्री, माजी आमदार सहभागी होणार आहेत.पंच हमी योजनेच्या अंमलबजावणीचे आश्वासन देऊन यावेळच्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेस बहुमताने सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाला आहे.
काँग्रेसने सशर्त गॅरंटी दिल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगाव येथेही आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने विनाशर्त पाच गॅरंटी जाहीर केल्या होत्या. मात्र सत्तेवर येताच या गॅरंटीना अट लागू केल्या असा आरोप करत याच्या निषेधार्थ भाजपने बेळगावात आज निदर्शने केली.
शहरातील चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून भाजप नेते व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की,कर्नाटकातील जनतेची फसवणूक करून जनतेशी खोटे बोलून काँग्रेसने सरकार स्थापन केले आणि आता जनतेला दिलेल्या हमी अटी घालून जनतेला देत आहेत. काँग्रेसला आम्ही योग्य धडा शिकवू असा इशारा दिला.
यानंतर अपर जिल्हाधिकारी शांतला यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील, डॉ. रवी पाटील, भाजप चिक्कोडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, राज्य कार्यकारिणी सदस्या उज्वला बडवाण्णाचे, लीना टोपन्नावर यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.