कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब
बंगळुरू :
गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू होती. डीके शिवकुमार की सिद्धरामैया यापैकी कोण कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार, याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील,अशी माहिती समोर आली आहे. तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील.
कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर अने सूत्र हलवण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आधीच दिल्लीला पोहोचले पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मात्र तब्येतीचं कारण देत दिल्लीला नंतर गेले.