फतेहपूर :
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात आज(दि. १६) भीषण अपघात झाला. दुधाच्या टँकरने ऑटोला धडक दिली. या दुर्घटनेत एकच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.कानपूर देहाटमधील मूसानगर येथील रिक्षाचालक आपल्या कुटुंबासह मूसानगर येथून जहानाबाद येथे नातेवाइकांच्या घरी जात होते. जहानाबादमधील एका वळणावर दुधाच्या टँकरने रिक्षाला धडक दिली. रिक्षातील १४ पैकी ९ जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.