“ठरलंय सर्व……पुन्हा अभय पर्व”अशा घोषणाबाजीने शहापूर परीसरात अभय पाटील यांचा झंझावाती प्रचार.
बेळगाव:
सध्या सर्वच मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी गतिमान झालेली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच रंग भरू लागला आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात अभय पाटील यांनी मतदारांशी थेट संपर्काची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे मतदारवर्ग त्यांच्याकडे खेचला जात आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याशी जोडले गेलेले व्यक्तीमत्त्व म्हणून अभय पाटील यांची ओळख आहे.
आळवण गल्ली – जेड गल्ली – येथून डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या प्रतिमेला हार घालून प्रचाराची सुरुवात झाली.मेलगे गल्ली – भोज गल्ली – खडे बाजार – मिरापूर गल्ली,महात्मा फुले रोड – रामलिंगवाडी – हट्टी होळ गल्ली -कचेरी गल्ली – कोरे गल्ली या परिसरात रंगबिरंगी रांगोळ्या काढून, फुगे लावून तसेच पुष्पवृष्टी करत अभय पर्व पुन्हा सुरू होणार असा जल्लोष करत अभय पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
या प्रचार फेरीत नगरसेवक जयंत जाधव,नितिन जाधव आणि गिरीश धोंगडी यांच्यासह संपूर्ण परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला होता . तसेच नागरिकांनी अभय पाटील आणि नगर सेवकांनी केलेला कामाबद्दल कौतुक केले आणि यांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला .