राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांचा राजीनामा

मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होण्याबाबतचा निर्णय आज घेतला आहे, अशी घोषणा करत राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असेल, हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. २) केले. यावेळी पवार म्हणाले की, आज सकाळीच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गेली ६० वर्षांहून अधिक काळ मी राजकारण आणि समाजकारणात मी सक्रिय आहे. यापुढेही मी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार आहे, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहातच कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी मागणी करत त्यांनी पवारांच्या निवृत्तीला तीव्र विरोध केला. व्यासपीठावर धाव घेत पवारांना गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post किच्चा नावाच्या गुगलीने अभय पाटील यांनी विरोधकांची उडविली विकेट 
Next post बेळगाव उत्तरचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांना वाढता पाठिंबा