अभय पाटील यांचे ध्येय “बीयोंड बंगळूर अप टू बेळगाव”
बेळगाव:
बेळगाव दक्षिण येथील मूलभूत आणि पायाभूत सुविधा पूर्ण केल्यावर आता बेळगाव येथील औद्योगिक विकास आणि आरोग्य विकास करण्याचे अभय पाटील ध्येय आहे. “बीयोंड बंगळूर अप टू बेळगाव” अशी अभय पाटील यांनी ग्वाही दिली. रविवारी ओम नगर येथून प्रचार फेरीला सुरुवात केली. ओम नगर – नार्वेकर गल्ली – आचार्य गल्ली, बिच्चू गल्ली – खडेबाजार-जोशी गल्ली बसवाण गल्ली पवार गल्ली, हरिजन वाडा संभाजीरोड-जोशीमळा – उप्पार गल्ली,गाढे मार्ग आणि वर्धाप्पा गल्ली असा प्रचारफेरीचा मार्ग होता .
रविवारी निघालेल्या प्रचारफेरीच्या माध्यमातून या भागात अभय पाटील यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. विकासाच्या मुद्द्यावर अभय पाटील यांनी केलेली विकास कामे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारी ठरली आहेत अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
तसेच त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.या भागात अभय पाटील यांनी घरोघरी प्रचार आणि रोडशो करून आपणाला मतदान करण्याचे आवाहन केले. अनेक ठिकाणी महिलांनी अभय पाटील यांची आरती करून स्वागत केले दक्षिण मतदार संघाचा सर्वांगीण विकास याचबरोबर तरुणांना रोजगार निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला विजयी करा असे आवाहन अभय पाटील यांनी केले आहे.