बेळगाव :
विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी,आज सोमवार. 24 एप्रिल अंतिम दिवस असून त्यानुसार आज दुपारी मतदार संघातील लढतीचे स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातून 360 उमेदवारी अर्ज 13 ते 20. एप्रिल दरम्यान केले होते. त्यापैकी 25 अर्ज हे छाननीत वैद्य ठरले. त्यानंतर आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून. आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी असलेल्या अंतिम दिवसांकडे. सर्वांचे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती वगळता राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांमध्ये यंदा चांगलेच नाराजीनाट्य रंगले आहे. अनेक जणांना उमेदवारी मिळाली नाही. त्यासाठी मतदारसंघातून अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही जणांकडून पक्ष बदलण्यात असल्यामुळे त्याची चर्चा राज्यात होती. शिवाय त्यातून बंडखोरीची ठिणगी पडण्याबाबत शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत नेमके किती व कोण उमेदवारी माघार घेतात, यावर बंडखोरी व लढतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अपक्ष उमेदवारांसाठी सोमवारी दुपारपर्यंत चिन्ह मिळणारा असून महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांना कोणते चिन्ह मिळणार आहे. याकडे सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागून आहे.