उद्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक

बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे चारही मतदार संघासाठी उमेदवार निश्चित झाले असून उमेदवारांच्या नावाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीसाठी बेळगाव उत्तरमधून अमर येळ्ळूरकर, दक्षिणमधून रमाकांत कोंडुसकर, ग्रामीणमधून आर. एम. चौगुले आणि खानापूरमधून मुरलीधर पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे.

आता विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरविण्या संदर्भात मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता मराठा मंदिर येथे बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला सर्व आजी-माजी नगरसेवक, महिला – युवा संघटना आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post बेळगाव दक्षिणमधून अभय पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल
Next post शिवाजी विद्यापीठाच्या २०२३ च्या प्रवेश परिक्षासाठी आवाहन –