आलारवाड ब्रिजवरून ताबा सुटल्याने कार कोसळली
बेळगाव :
आलारवाड ब्रिजवरून धारवाडहून बेळगावच्या दिशेने येणारी के ए २२ एम ए ८३७० या क्रमांकाची कार चालकाचा ताबा सुटल्याने कोसळली. ब्रिजच्या संरक्षक कठड्याला धडकून थेट हि कार सर्व्हिस रोडवर येऊन कोसळली. या वाहनातून पाच जण प्रवास करत होते. मात्र सुदैवाने कारमधील पाचही जण सुरक्षित आहेत.
काहींना किरकोळ दुखापत झाली असून केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात जीवितहानी झालेली नाही.सायंकाळी ४.३० च्या दरम्यान हा अपघात झाला असून यादरम्यान वाहनातील एअरबॅग सुटल्याने वाहनातील पाचजण सुरक्षित राहिले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.