म.ए.समिती निवड कमिटी कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार

म.ए.समिती निवड कमिटी कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार

बेळगाव :

बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर या दोन्ही मतदारसंघांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार निवडीची प्रक्रिया जाहीर केली. 4 ते 6 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार विजयी होईल, यासाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहन शहर म. ए. समितीने कार्यकर्त्यांना केले.

शहर म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीदरम्यान विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी प्रत्येक विभागातील सदस्यांची कमिटीमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपापल्या भागातून म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त नावे द्यायची आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post “सावकार” मुळे भाजपच्या उमेदवार निवडीत अडचण
Next post भगवान महावीरांची जयंती बेळगावात उत्साहात साजरी