“मच्छे व पूरणवाडी ग्रामपंचायत म्हणून घोषित “मा. मुख्यमंत्री यांचा कडून आदेश जारी : आ.अभय पाटील यांच्या प्रयत्नाला यश.
आ.अभय पाटील यांच्या प्रयत्नाला यश .मच्छे व पूरणवाडी ग्रामपंचायत म्हणून मुख्यमंत्री बसवराज बोंमय यांनी आज आदेश जारी केली आहे.या पुढे मच्छे व पूरणवाडी ग्रामपंचायत म्हणून संबोधले जाणार.
काही वर्षांपूर्वी माचे व पुरणवाडी या ग्रामपंचायती होत्या .तेव्हा पट्टण पंचायत म्हणून घोषित व्हावे असे लोकांना वाटत होते ,त्या प्रमाणे कार्यवाही करून पट्टण पंचायत म्हणून घोषित केले गेले.आता गेल्या एक वर्षापासून पुन्हा ग्रामपंचायत म्हणून घोषित व्हावे अशी विनंती रहिवाश्यांनी, आ.अभय पाटील यांच्याकडे केली होती .
अभय पाटील यांनी हा मुद्दा उचलून धरला व सर्व विभागांकडे पाठपुरावा करून , अखेर त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी युुद्धपातळीवर सर्व कार्यवाही पूर्ण करून आज आदेश जारी केली आहे.
मच्छे व पूरणवाडी नागरिक आ अभय पाटील यांचा आभार मानलें.