आ.अभय पाटील यांचा हस्ते ग्रामप्रशासनाच्या अधिकाऱ्यांना संगणक उपकरणांचे वितरण.
बेळगाव:
आज दिनांक 28 मार्च रोजी माननीय श्री.अभय पाटील आमदार बेळगाव दक्षिण यांच्या सन 2022-23 च्या स्थानिक क्षेत्र विकास प्रकल्पाच्या अनुदान अंतर्गत ग्राम प्रशासन अधिकार्यांना देण्यात आलेल्या संगणक साहित्याचा वितरण समारंभ गाडगे सभागृह येथे संपन्न झाला. सुमारे 10 लाख किमतीचे संगणक, प्रिंटर आदींचे वाटप करण्यात आले.
नगरसेवक जयंत जाधव व ग्राम प्रशासकीय अधिकारी तालुका संघटनेचे अध्यक्ष श्री किरण तोरगल, ग्राम प्रशासकीय अधिकारी संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांता शिंदे, बेळगावी दक्षिण मतदार संघाचे ग्राम प्रशासकीय अधिकारी गोपाळ होसकोटे, शशिधर पाटील, दिनेश शेठ, सिद्धू मराठे संतोष जोगळेकर, मयुरा मासेकर आदी मान्यवर उपस्थित होते., तसेच गावातील सर्व लोकसेवक व नागरिक उपस्थित होते.