राजकीय षडयंत्र रचून माझे नाव काँग्रेसच्या उमेदवारी यादीतून वगळले:रमेश कुडची.
बेळगाव:
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांची आता उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात खलबते सुरू आहेत. काँग्रेस पक्षाने राज्यातली पहिली संभाव्य यादी जाहीर केली आहे. मात्र राजकीयषडयंत्र रचून माझे नाव वगळण्यातआले आहे, अशी तक्रार माजी आ. रमेश कुडची यांनी काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांच्याकडे केली आहे.. सूरजेवाला यांना लिहिलेल्या पत्रात कुडची यांनी म्हटले आहे की, मी बेळगाव दक्षिणसाठी इच्छुक आहे. पण राजकीय षडयंत्र रचून माझे नाव काँग्रेसच्या उमेदवारी यादीतून वगळले आहे. याची दखल घेऊन याचा फेरविचार व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे.