चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का : दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन
मुंबई:चित्रपट निर्माते प्रदीप सरकार यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. २४ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांचे निधन झाले. सरकार यांनी परिणीता, लगा चुनरी में दाग, मर्दानी आणि हेलिकॉप्टर ईला या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. ते डायलिसिसवर होते आणि पोटॅशियमची पातळी खूपच कमी झाली होती. रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पहाटे ३ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले.सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे