१ किलो १०५ ग्रॅम गांजा जप्त, खानापूर पोलिसांची कारवाई
खानापूर : प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात गांजा विक्रीच्या घटना सतत घडत आहेत. याची खानापूर पोलिसांनी दखल घेऊन शुक्रवारी दि. १७ राजी सायंकाळी ६.४५ वाजता खानापूर शहरापासून जवळ असलेल्या रूमेवाडी क्रॉसजवळ मन्सूर आप्पालाल कमानदार वय ३९, रा.पारिश्वाड (ता. खानापूर) व रामचंद्र नागाच्या शिंदे वय ६३,रा. लक्केबैल (ता. खानापूर) यांच्याकडून अमली पदार्थ गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळताच खानापूर पोलिस ठाण्याचे सीपीआय रामचंद्र नाईक व सहकाऱ्यांनी बैलहोंगल डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली चोरून गांजा विक्री करणाऱ्यां १ किलो १०५ ग्रॅम वजनाचा गांजा तसेच सोबत स्कूटी केए २२ एच एम ०९१२ दुचाकी जप्त करून त्यांच्यावर ६१ / २०२३ कलम २० बी, एन डीपी एस गुन्हा दाखल करून सदर आरोपींना न्यायालयात हजर केले आहे.
याबाबत बेळगाव एस पी यांनी खानापूर पोलिसस्थानकाचे अभिनंदन केले आहे.
O