नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी शहापूर विभागातील रंगोत्सव उत्साहात साजरे केले.
बेळगाव :
रविवारी शहापूर, वडगाव,खासबाग आणि ग्रामीण भागात रंगपंचमी जल्लोषात साजरी करण्यात आली. आबालवृद्धांच्या सहभागाने हा रंगोत्सव दुपारपर्यंत रंगला होता.
आज रविवारी सकाळपासून शहापूर, वडगाव, खासबाग आणि ग्रामीण भागात रंगोत्सव सुरू झाला. अबालवृद्ध एकमेकांवर रंगांची उधळ करताना दिसत होते. यात मुले तरुणांचा सहभाग मोठा होता. विविध गल्लीत रंग खेळण्यासाठी शॉवरची सोय करण्यात आली होती.
नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी कचेरी गल्लीत,हत्तीहोली गल्लीत लहान मुलं सोबत होळी खेळून प्रोत्साहन दिले. एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करत होते.अनेक ठिकाणी डॉल्बीच्या तालावर ठेका धरत तरुणाईने रंगांची मुक्त उधळण करत सोबत चिंब भिजण्याचा आनंद लुटला.
डॉल्बीचे ठेक्यावर थिरकणारी तरुणाई ,गल्लोगल्लीत लावण्यात आलेले पाण्याचे कारंजे, उंचावरून पडणाऱ्या पाण्यात रंग उधळणारे, आनंद लुटणारे अवालबुद्ध लक्ष, वेधून घेणारा महिलांचा सहभाग, सप्तरंगात चिंब भिजत बेभान होऊन नृत्य करणारे युवक अशा वातावरणात हा रंगोत्सव सोहळा साजरा झाला.