पंतप्रधान मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी किसान
सन्मान निधी वाटप: मंत्री शोभा करंदलाजे
बेळगाव :
27 फेब्रु. रोजी बेळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान किसान सन्मान निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली.
बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथे पंतप्रधान दौऱ्यासंदर्भात पूर्व तयारीची पाहणी केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी गुरुवारी (23 फेब्रुवारी) बोलत होत्या.हा संपूर्ण शेतकरी कार्यक्रम आहे. त्यामुळे शेतकरी आणि विशेषतः महिला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावच्या कार्यक्रमात प्रथमच पंतप्रधान किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. रोड शोचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही.
अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.पीएम-किसान ही शेतकऱ्यांसाठी योजना आहे. शेतकरीमहिलांचा शेती करण्यात मोठा वाटा आहे. त्यामुळे महिला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होणार असल्याचे करंदलाजे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कार्यक्रमाची तयारी वव्यासपीठ उभारणीबाबत माहिती दिली. चारही बाजूला जेवण आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात
येत आहे. यावेळी प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ, राज्यसभा सदस्य एरण्णा काडादी, आमदार अभय पाटील, अनिल बेनके, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, महानगर पालिका आयुक्त रुद्रेश घाळी आदी उपस्थित होते.