आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नाला यश : मुख्यामांत्र्यांकडून शहाजी राजे भोसले यांचा समाधी स्थळाच्या विकाससाठी 5 कोटी रु. मंजूर
बेळगाव:
कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यात होदुगेरे या गावी असणार्या शहाजीराजे भोसले यांच्या दुर्लक्षित समाधी स्थळाच्या विकासासाठी आ. अभय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शहाजीराजे यांच्या होदूगेरे येथील समाधी स्थळासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे .या निर्णयाबद्दल बेळगाव दक्षिणचे आ.अभय पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत .
बेळगावसह संपूर्ण राज्यभरातील शिवप्रेमी नागरिकांतून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. शहाजीराजे यांच्या समाधी स्थळाबाबत यापूर्वी सातत्याने आवाज उठवण्यात आला होता. तसेच राज्यातील विविध संघटनांनी याबाबत आवाज उठवून राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची मागणी केली होती.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी देखील याबाबत मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आता या प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे हा समाधी स्थळाचा विकास निश्चित करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आ.अभय पाटील यांनी व्यक्त केली.