बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या हस्ते खासबाग येथील बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन
बेळगाव : प्रतिनिधी
शहरातील महापालिकेच्या तिसऱ्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पातही दररोज 500 किलो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
त्यापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचा वापर तेथील स्वयंपाकगृहासाठी केला जाणार आहे. गोवावेस येथील चंपाबाई भोगले शाळेच्या आवारात हा प्रकल्प उभारण्यात आला. गेल्या महिन्यात त्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले असून त्या प्रकल्पातील गॅसचा वापर तेथील मुलींच्या वसतिगृहातील स्वयंपाकगृहासाठी केला जाणार आहे.
एपीएमसी येथे मोठा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येत आहे.त्यासाठी दररोज पाच टन ओला कचरा वापरला जाणार आहे. त्या प्रकल्पातून बायोगॅस किंवा वीजनिर्मिती केली जाणार आहे.