आ.अभय पाटील यांच्या पुढाकारमुळे वॉर्ड नं.29 मध्ये अंडरग्राऊंड डस्टबीन : नितीन जाधव
बेळगाव:
देशातील पहिल्या अंडर ग्राउंड डस्टबिनचे ,आ. अभय पाटील यांच्याहस्ते बेळगावात उदघाटन करण्यात आले होते. बेळगाव शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून अनेक विकासकामे राबविण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे विकास केंद्रीभूत मानून चालणाऱ्या बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या संकल्पनेतून अनेक नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून आज वॉर्ड नं 29 येथील आरपीडी कॉर्नर , खानापूर रोड येथील जो ब्लॅक स्पॉट होता तो आज स्वच्छ करून त्याच बाजूला उंडर ग्राउंड डस्टबीन बसविलेला आहे त्याचा नागरिकांनी उपयोग करावे असे आवाहन कॉर्पोरेटर नितीन जाधव यांनी केले आहे .
जर कोणी हया पुढं स्वच्छ केलेल्या ठिकाणी कचरा टाकल्यास महानगर पालिके तर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही ते सांगितले. ह्यावेळी कॉर्पोरेटर नितीन जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते