बेळगाव सिकंदराबाद रेल्वे सेवेला हिरवा झेंडा…
बेळगाव प्रतिनिधी
बेळगाव-सिकंदराबाद या नव्या रेल्वेसेवेला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली आहे या सेवेला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
खा. मंगल अंगडी, आ. अनिल बेनके यांनी हिरवा झेंडा दाखवून या सेवेचे उदघाटन केले. बेळगाव-सिकंदराबाद-बेळगाव या मार्गावर रेल्वेसेवा सुरु करण्याची प्रवाशांची खूप दिवसांची मागणी होती.
त्याची दखल घेऊन खा. मंगल अंगडी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने या रेल्वेसेवेला मंजुरी दिली.
बेळगाव रेल्वे स्थानकावर खा. मंगल अंगडी, आ. अनिल बेनके यांनी श्रीफळ वाढवून, हिरवा झेंडा दाखवून या सेवेचे उदघाटन केले.या रेल्वेचे आजचे बुकिंगही फुल्ल झाले आहे.
बेळगावातून दुपारी १.१० वाजता ही ट्रेन सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३०ला सिकंदराबादला पोहोचेल. या नव्या रेल्वेमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.