Home / English / Belgaum Municipal Corporation: Standing Committee chairman elected unopposed

Belgaum Municipal Corporation: Standing Committee chairman elected unopposed

बेळगाव महानगरपालिका: स्थायी समिती प्रमुखांची निवड बिनविरोध..

महानगरपालिकेच्या चार स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवडणूक एकमताने पार पडली.

ही प्रक्रिया अशा प्रकारे पार पाडण्यात आली की कोणालाही असमाधान वाटले नाही आणि समान न्याय सुनिश्चित करण्यात आला.

 आ.अभय पाटील आणि माजी आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पार पडली.

रेखा मोहन हूगर यांची कर आकारणी, वित्त आणि अपील या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली.

लक्ष्मी महादेव राठोड यांची सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्याय या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नगररचना व विकास स्थायी समितीच्या सभापतीपदी माधवी राघोचे यांची निवड करण्यात आली.

लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नंदू मिरजकर यांची निवड झाली.

नवनिर्वाचित अध्यक्षांचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि सत्तारूढ पक्षनेते हनुमंत कोंगाळी यांनी अभिनंदन केले.